पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

जातीचं राजकारण करणाऱ्यांचे दिवस संपले असून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्या लोकांना आपण विकासाने उत्तर देऊ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीवर निशाणा साधला. स्वर्गीय केंद्रीय मंत्री आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथगड येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की,  मी फार मोठी कर्जदार आहे. माझ्या मतदारांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. जातीपातीचं राजकारण मोडीत काढून विकासाने या कर्जाची परतफेड करायची आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही व्यक्त केला. आज तुम्ही जसे या व्यासपीठावर आलात तसेच पुढील वर्षी देखील मुख्यमंत्री या नात्यानेच तुम्ही गोपीनाथ गडावर उपस्थित रहाल, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपचे यश पाहण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे आज हवे होते. त्यांच्यामुळेच आमच्यासारखे नेते घडले. त्यांची कमतरता आम्हाला आज जाणवते. त्यांनी मराठवाड्यात रेल्वे यावी, पाणी मिळावे यासाठी संघर्ष केला. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचे मुंडे यांचे स्वप्न होते. ते आम्ही पूर्ण करु. गोदावरी खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणून पूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.