कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठयाप्रमाणात वाढला आहे. हा विषाणू तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ ते ३१ मार्च या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरत असून, या यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने १४ एप्रिलपर्यत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला आहे. आंतरजिल्हा प्रवास करण्यास ही राज्य शासनाने बंदी घातली आहे, अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठया प्रमाणावर पंढरपुरात भाविक आले तर, कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंदिर समितीने आता मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीमा सील करा, वाहतूक रोखा, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पंढरपूर शहर-परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी फुड पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे, ही बाब विचारात घेवून मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामगारांना मोफत सेवा द्या, प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार रामचंद्र कदम, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ज्ञानेश्वर देशमुख, अँड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांच्याशी विचारविनिमय करून निर्णय घेतल्यानंतर सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.