विठुरायाच्या पंढरीत भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यां पैकी एक असलेला चैत्री एकादशी सोहळा उत्साहाने संपन्न झाला. कोरोना विषाणूच्या संकटामुळे इतिहासात ४०० वर्षांच्या वारी परंपरेला भाविकाविना पहिल्यांदाच खंड आला. चैत्री एकादशी निमित्तानं गुलाब पुष्पांनी विठुरायाचा गाभारा सजवण्यात आला होता. चैत्री एकादशी निमित्त विठूरायाची महापूजा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यहस्ते तर रूक्मिणीची महापूजा सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली.
कोविड १९ : वयोवृद्ध रुग्णांवर मुंबईत केवळ मोठ्या रुग्णालयात उपचार
देशावर आलेले कोरोनाचे संकट पाहता विठूरायाची चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी चैत्री वारीला तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती असते. चैत्री वारी रद्द केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल या उद्देशाने वारी रद्द करण्यात आली. यामध्ये वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढीनुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन श्री विठ्ठल रूक्मिणीचे पूजन करावे, पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन वारकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले होते.
कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला: राज ठाकरे
दरवर्षी प्रमाणे, लाखोंच्या संख्येने टाळ मृदंगाच्या गजरात मुख्यी हरीनामाचा गजर, संताचे अभंग उच्चारत एकादशी सोहळा मोठ्या उत्साहाने होत असतो. परंतु दुर्दैवाने यावर्षी चैत्री एकादशीचा सोहळा भाविकाविना पहिल्यांदाच साजरा झाला. यात्राकाळात नेहमी गजबजणाऱ्या पंढरीनगरी शुकशुकाट पहायला मिळाला. चैत्री एकादशी सोहळ्याला हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सदस्य, नगराध्यक्षा साधना भोसले, श्री विठ्ठल मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम आणि मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या आवाहनाला नितीन राऊत यांचा आक्षेप