पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरपूरः ४ ते २२ जुलैदरम्यान विठ्ठल मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले

पंढरपूर

आषाढी यात्रेनिमित्त येत्या ४ ते २२ जुलै दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास सुरु राहणार आहे. दि. ३ जुलैपासून ऑनलाइन दर्शन सुविधा बंद केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

राज्य सरकारचा पवारांना धक्का, नीरेचे पाणी उजव्या कालव्यात सोडणार

आषाढी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून पालखी सोहळे आपापल्या भागातून पंढरीत दाखल होण्यासाठी निघाले आहेत. यंदाच्या यात्रेसाठी १५ लाखांहून अधिक भाविक सहभागी होतील, असा अंदाज धरून प्रशासन यात्रेची तयारी करीत आहे. यात्रेमध्ये १२ जुलैला आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होत आहे. 

माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल

येत्या ४ जुलै रोजी अकरा वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला जाणार आहे. प्रक्षाळपूजेपर्यंत श्री विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू असते.