पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उस्मानाबादः पाटील पिता-पुत्रांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पाटील पिता-पुत्र रविवारी सोलापूर येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करतील. कुठलाही निर्णय घाईत घेतला नसल्याचे राणा जगजितसिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच पक्ष सोडला असला तरी पवार कुटुंबीयांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी श्रीरामपूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पद्मसिंह पाटील यांच्याबाबतच्या प्रश्नावरच पत्रकारावर भडकले होते. 

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

पाटील पिता-पुत्रांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपला निर्णय जाहीर केला. राणा जगजितसिंह यांनी हा निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांना जल्लोष केला. उस्मानाबादचा सर्वांगीण विकास करणे, हक्काचे पाणी आणणे, युवकांना रोजगार देण्यासाठी भाजपत जात असल्याचे ते म्हणाले. 

अजित पवार यांचे मेहुणे असलेल्या पद्मसिंह यांचे मन वळवण्याचे प्रयत्न पवार कुटुंबीयांकडून सुरू होता, असे सांगण्यात येते. मात्र, त्यात यश आले नसल्याचे दिसून येते.

भाजप चोरांचा पक्ष होतोय का? प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल