पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशकातील भीषण आगीमुळ लॉकडाउनमध्ये अनेक कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ

अंधेरीत इमारतीला भीषण आग

 नाशिकमधील भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये भीषण आगीची घटना शनिवारी घडली. यात झोपडपट्टीतील दोनशे घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र लॉकडाउनच्या संकटामुळे अडचणीत असलेल्या येथील लोकांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. 

 

सिब्बल म्हणाले, मोदीजी CAA, NRC वाद विसरुन कोरोनाविरोधात एकत्र लढू

पीटीआयच्या वृत्तानुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागली. दाट लोकवस्ती असल्यामुळे परिसरात आग वेगाने पसरली. घरातील सिलेंडर्सच्या स्फोटाने आग अधिक वाढली. परिणामी जवळपास २०० घरे जळून खाक झाली.  या आगीत जनावरे जखमी झाले असल्याचे समजते. दरम्यान आग आटोक्यात आणताना अग्नीशमन दलातील काही जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीला परवानगी नाहीच, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण