पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जातील: एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

फडणवीस सरकारच्या मागील पाच वर्षांच्या काळात दाखल करण्यात आलेले अन्यायकारक गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या: खासदार संभाजीराजे

एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन गुन्हे मागे घेतले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच विविध प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. राज्यात गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. गुन्हे मागे घेताना संबंधित व्यक्ती कोणत्या पक्षाशी संलग्नित आहेत, याचा विचार केला जाणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

डेटाच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

तब्बल चार तास झालेल्या बैठकीत राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर राज्यातील मंत्री नितीन राऊत आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीही उद्धव ठाकरे यांना भेटून भीमा-कोरेगाव आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:our government will drop agitation cases from last five years in maharashtra says Minister eknath shinde