पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवली : मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने १ हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षांत वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना होईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

'रोजगार भरपूर पण उत्तर भारतीयांमध्ये 'क्वॉलिटी'ची कमतरता'

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती ( जिल्हा पुणे) या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई- लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभ, जळगावच्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचे ई- भूमीपूजन, मुंबई येथील जे.जे.रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, खा. संजय काकडे, खा. गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आ. माधुरी मिसाळ, आ. मेधा कुलकर्णी, आ. जगदीश मुळीक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

'लक्षात ठेवा! जाहिराती पाहून तेल आणि साबण निवडतात सरकार नव्हे'

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते म्हणाले, जे.जे.रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीसाठी १२०० कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला २०१४ मध्ये परवानगी मिळाली होती. त्यासाठी ५०० कोटी देण्यात आले. तेथे प्रवेश सुरू झाले आहेत. राज्यात आणखी ७ नवीन वैद्यकीय कॉलेज सुरू होतील. केंद्राकडे एकूण ३५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास २०१७ मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पध्दती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पध्दतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: our government Increased the capacity of medical colleges in the state says cm devendra fadnavis