पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुसळधार पावसानंतर नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहू लागला

नर-मादी धबधबा

राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. दुष्काळी भागांना सुध्दा या मान्सूनोत्तर पावसाने झोडपून काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे त्याठिकाणचा शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातला नळदुर्ग किल्ल्यावरील नर-मादी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. 

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन, पण तूर्त सुटका नाही

नळदुर्ग किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा पावसामुळे वाहू लागला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण असलेला हा धबधबा तब्बल दोन वर्षांनंतर वाहत आहे. गेली दोन वर्ष मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आसल्याने हा धबधबा बंद होता. त्यामुळे पर्यटकांची निराशा होत होती.

भारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासन उस्मानाबाद जिल्ह्यातील अने भागामध्ये मान्सूनोत्तर पाऊस पडत आहे. त्यामुळे नळदुर्ग येथील बोरी धरण पूर्णपणे भरले असून नळदुर्ग किल्ल्यामध्ये असलेले नर-मादी धबधबा वाहू लागला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. 

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या चाळ्यांनी हॉस्टेस वैतागल्या