पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून ७ लाखाचा निधी

साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून ७ लाखाचा निधी

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या वतीने ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांनी दिली.

कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. संमेलनासाठी संयोजन समितीच्या वतीने निधी संकलन सुरू आहे. या कार्यासाठी हातभार म्हणून जिल्ह्यातील नामांकित बहुराज्यीय उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या वतीने ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रकमेचा धनादेश बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांच्याकडे सुपुर्द केला. 

गायीची सेवा केल्यास गुन्हेगाराचा अपराधी भाव कमी होतोः मोहन भागवत