पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट पीडितेची प्रकृती गंभीर पण स्थिर; उद्या होणार शस्त्रक्रिया

मेडिकल बुलेटिन

हिंगणघाट प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी पीडितेच्या प्रकृतीबाबत गुरुवारी मेडिकल बुलेटिन जारी केले. यामध्ये त्यांनी पीडितेच्या शरिरामध्ये इन्फेक्शन होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली.  

गूटखा विक्री करणाऱ्यांवर 'मोकां'तर्गत कारवाईचे संकेत

ऑरेंजसिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'पीडितेच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. तिच्या शरिरामध्ये इन्फेक्शन होण्यास सुरुवात झाली आहे. पीडिता अजूनही डोळ्यांच्या पापण्या उघडत नाहीये. शुक्रवारी तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसंच, पीडितेच्या पोटात अन्न जाण्यासाठी नळी टाकण्यात येणार होती मात्र सूज असल्यामुळे ती टाकता आली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. 

फास्टॅगच्या माध्यमातून कोट्यवधींची चोरी, चौघांना अटक

दरम्यान, सोमवारी पीडित तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की नगराळे याला अटक केली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केले. दरम्यान, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कायद्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तसंच, पीडित कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 

'सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते'