पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची प्रकृती नाजूक

मेडिकल बुलेटिन

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची सहाव्या दिवशी मृत्यूशी झुंज सुरुच आहे. पीडितेची प्रकृती खालावली आहे. तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी पीडितेच्या प्रकृतीबाबत शनिवारी मेडिकल बुलेटिन जारी केले. यामध्ये त्यांनी पीडितेची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले. 

हिंगणघाट प्रकरण: आरोपी विकेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत

ऑरेंजसिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'हिंगणघाट पीडितेवर उपचाराचा सहावा दिवस आहे. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे. पीडितेला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. पीडितेला बोलता येत नाही मात्र ती इशाऱ्याने सांगते. पीडितेची प्रकृती स्थिर केल्यानंतर उद्या तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली जाईल.' 

संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट

दरम्यान, हिंगणघाट प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी विकेशला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवताना पुढे गरज पडल्यास पोलीस कोठडी मागू, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून आरोपीला सकाळी ६ च्या आधीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

पश्चिम रेल्वेवर आज ८ तासांचा ब्लॉक; चर्चगेट-मुंबई सेंट्रल लोकल बंद