पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्थगिती सरकारमुळे महाराष्ट्र ठप्प, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर घणाघाती शब्दांत हल्ला केला. सरकार स्थापन होऊन ३ आठवडे होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. खातेवाटपही तात्पुरते करण्यात आले आहे. सत्तेतल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद आहे. नागपूर अधिवेशनासाठी भरपूर वेळ असूनही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नाही. याचाच अर्थ त्यांना नागपूर अधिवेशनाचे गांभिर्य नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अपेक्षित होते. आम्ही तात्पुरती मदत दिली होती. मध्यंतरी राज्यपालांनीही मदत जाहीर केली. पण हे सरकार आल्यानंतर अद्यापही यावर निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत चहापान होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभी इश्क के इम्तिहाँ और भी है..नवाब मलिक यांचे सूचक टि्वट

ते म्हणाले की, हे सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक गोष्टीला स्थगिती देत आहे. हे स्थगिती सरकार आहे. यांच्यामुळे महाराष्ट्र ठप्प झाला आहे. महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. याचा महाराष्ट्राच्या प्रतिमेवरही परिणाम होताना दिसत आहे. जिथे धोरणांमध्ये सातत्य नसते. तिथे कोणीही गुंतवणूक करत नाही. जबाबदारी झटकण्यासाठी हे सरकार आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नागरिकत्व कायद्यात बदल होण्याची शक्यता, अमित शहांनी दिले संकेत

अवकाळी पावसामुळे सुमारे ९३ लाख हेक्टर फळबागांचे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रति हेक्टर २५ हजार रुपयेप्रमाणे २३ हजार कोटी त्वरीत दिले पाहिजेत. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका केली.

'पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राइक'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:opposition leader devendra fadnavis slams on uddhav thackerays government nagpur assembly winter session