महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फुटण्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी बुधवारी या संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी केली जाण्याची मागणी केली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी बुधवारी विधान भवनाच्या पायरीवर निदर्शने केली.
पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, वर्धापनदिनी पक्षाचा निर्धार
चालू आर्थिक वर्षाचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मंगळवारी विधीमंडळात मांडण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्पाचे वाचन करीत असताना त्याच्या भाषणातील मुद्दयांपूर्वीच त्यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवरून विविध घोषणांच्या जाहिराती प्रसृत झाल्याचा आरोप विरोधकांनी मंगळवारी केला. याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला होता. बुधवारी सकाळी हाच मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला.
जयंत पाटील म्हणाले, काल सभागृहात जे घडले, ते पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे होते. अर्थसंकल्प फुटणे ही साधी गोष्ट नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची माहिती बाहेर कोणाला दिली होती, हे कळले पाहिजे. कोणाचा फायदा करून देण्यासाठी सरकारने हे काम केले आहे का, हे सुद्धा सभागृहाला कळले पाहिजे. त्यामुळेच याची चौकशी करण्यात आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शैक्षणिक पात्रतेची अट रद्द
याच मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी घोषणा दिल्यामुळे सभागृहाचे कामकाज सभापती रामराजे निंबाळकर यांनी दहा मिनिटांसाठी तहकूब केले होते.