पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नकाः चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

नरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  

'मुंबईत शिवसेना नंबर एक तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवी'

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व उघडे पाडण्यात यशस्वी झालो तर निवडणुकीत यश हमखास मिळेल. पण त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, असे बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले असे म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री झाले. मुलालाही मंत्री केले, अशी टीकाही पाटील यांनी केली. 

इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन म्हणजे दाढी कुरवाळण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, आमदार अतुल सावे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर हरिभाऊ बागडे यांचे छायाचित्र नसल्याचे लक्षात आल्यावर धावपळ करत त्याच आकाराचे छायाचित्र आणून ते चिकटवण्यात आले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार हरिभाऊ बागडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घडला.

हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहिन बागेत जमावबंदी, बंदोबस्तात वाढ