पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिर्डीमध्ये किरकोळ वादातून गोळ्या झाडून एकाची हत्या

भाजप समर्थक भावाने गोळ्या झाडल्या आहेत.

शिर्डीमध्ये किरकोळ वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिर्डीजवळच्या लोणी गावात ही घटना घडली आहे. शाब्दिक चकमकीतून झालेल्या गोळीबारात फरदीन  कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री लोणी येथील साई छत्रपती हॉटेलमध्ये ही घटना घडली. आर्थिक देवाण-घेवाणीतून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. 

'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'

लोणी गावातील हॉटेल साई छञपतीमध्ये रात्रीच्या वेळी शाब्दिक वाद करत फरदीन अब्बू कुरेशीवर चार ते पाच जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत कुरेशीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. कुरेशीच्या आईने लोणी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना कशामुळे घडली याचा तपास लोणी पोलिस करत आहेत.

टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!