पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरात शिवशाही बसला अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू

सोलापूर शिवशाही बस अपघात

सोलापूरमध्ये शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूरातील शेटफळ फाट्याजवळ घडली आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. शिवशाही बस पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने येत असताना अपघात झाला. 

'अयोध्येतील मशिद इस्लामी संस्कृतीनुसार आहे की नाही याचाही फैसला करणार'

पुण्यावरुन सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या शिवशाही बसवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने हा अपघात झाला. या बसमधून एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर ११ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मल्लिकार्जुन आबुसे असं मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. 

सार्वजनिक कार्यक्रमात बोलू नका, प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपचे आदेश

अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नजीकच्या सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये शिवशाही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, एसटी प्रशासनाने अपघातातील जखमींना एक हजार तर मृतांच्या कुटुंबियांना १० हजार रुपयांची मदत दिली आहे. या घटनेनंतर पुणे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.  

गणेशभक्तांची गर्दी पाहता तुतारी एक्स्प्रेसचे ३ डबे वाढवले