पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू, राज्यात आकडा पोहोचला १९३ वर

कोरोना

राज्यात कोरोनाचा सातवा बळी गेला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या एमसीजीएम रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून या महिलेला श्वास घेण्यास अडचण येत होती. त्याचबरोबर त्यांच्या छातीत वेदनाही होत होत्या. शनिवारी त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेने पत्रक काढून त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. 

त्याचबरोबर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढला आहे. रविवारी राज्यात आणखी ७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४ रुग्ण हे मुंबई, पुणे, सांगली आणि नागपूर येथे प्रत्येकी एक असे ७ रुग्ण आढळून आले आहेत. इस्लामपूरमधील कोरोनाग्रस्त कुटुंबातील चिमुरड्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बधितांची संख्या आता २४ वर गेली आहे. 

नागपूरमध्ये ११ वर्षांची मुलगी करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे.

दरम्यान, राज्यातून कोरोना विषाणूशी संबंधित काही सकारात्मक घटनाही समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड येथे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या पाच जणांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तर अहमदनगरमधील पहिल्या कोरोना बाधिताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हा रुग्ण बरा झाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:One more death in Mumbai for COVID 19 coronavirus 40 years old woman dies found new positive cases in state