पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करमाळा इमारत दुर्घटना प्रकरण; मृतांचा आकडा दोनवर

करमाळा इमारत दुर्घटना प्रकरण

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या वृध्द महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी करमाळ्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेमध्ये काल एकाचा मृत्यू झाला होता. तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर करमाळ्याच्या कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा मृत्यू; अमेरिकेची माहिती

करमाळा शहरातील सागर चित्रपटगृहाशेजारी असणाऱ्या इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर बँकेची शाखा आहे. अचानक बुधवारी दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये काल बँकेचीतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर 15 जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, मध्यरात्री उपचारा दरम्यान गंभीर जखमी झालेल्या लोचना गुंजाळ या वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबादमध्ये पाण्याच्या बादलीत पडून बाळाचा मृत्यू

या दुर्घटनेचा तपास करमाळा पोलिस करत आहे. पोलिसांनी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 304, 337, 338 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आले नाही. 

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : ईडीने मृत साक्षीदाराला २४ तासांत केलं जिवंत