पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्याणमध्ये आढळला कोरोनाचा आणखी एक रुग्ण

कोरोना विषाणू

कल्याणमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे. ६ मार्चला परदेशातून परतलेल्या एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती डोंबिवली महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. संबंधित रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही महानगर पालिका प्रशासनाने म्हटले आहे. कल्याणमधील या रुग्णानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३३ वर पोहचला आहे. 

२८९ प्रवाशांना दुबईला घेऊन जात असलेल्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा थाबतानाचे चित्र दिसत नाही. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात आतापर्यंत १०३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ३० चा आकडा पार केला आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात विशेष योजना आखण्यात येत असून पुणे-मुंबई नंतर धुळे, सोलापूर, औरंगाबाद आणि मिरज याठिकाणी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उपाययोजना करण्यासंदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. 

COVID-19: जगभरात ६ हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव

पुणे-मुंबईसह आता राज्यभरात मॉल्स, थिएटर्स, आणि गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नागरिकांनी गर्दी करु नये, विनाकारण प्रवासासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गावागावांत होणाऱ्या अनेक यात्रा रद्द करण्यात आले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन योग्य ते सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. राज्यातील आकडा वाढला असला तरी चुकीचा संदेश पसरवून भितीचे वातावरण निर्माण न करता योग्य ती खबरदारी घ्या, अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: one more case in kalyan story number of positive cases of coronavirus in maharashtra rises to 33