पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

स्फोटात जखमी झालेले तरुण

चंद्रपूरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहिती नसताना हॅन्ड ग्रेनेडची चुकीच्या पद्धतीने हाताळणी करण्याच्या प्रयत्नात स्फोट झाला. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी बुर्गी गावात ही घटना घडली आहे. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात लूला रानू मडावी (२५ वर्ष) या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर त्याचे दोन भाऊ रानू मडावी आणि रमेश करपा मडावी जखमी झाले आहेत. जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २०१४ साली कांदोळी बुर्गी येथे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांना काही शस्त्र आणि हॅन्ड ग्रेनेड सापडले होते. 

'संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल'

मृत तरुण लूलाकडे देखील एक हॅन्ड ग्रेनेड होते. सोमवारी सकाळी ११ वाजता या हॅन्ड ग्रेनेडचा इतर कसल्यातरी कामासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अचानक स्फोट झाला. या स्फोटावेळी लूलाचे दोन चूलत भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते. स्फोटामध्ये लूलाचा जागीच मृ्तयू झाला. तर दोघे जण जखमी झाले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. 

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम