पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यवतमाळमध्ये एसटी-टँकरचा भीषण अपघात; एक ठार तर २५ जखमी

यवतमाळ अपघात

यवतमाळमध्ये एसटी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजंती येथे ही घटना घडली. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

... तर ज्ञानदेव म्हणाले असते अच्छे दिन येईचिना - उद्धव ठाकरे

दाट धुक्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातामध्ये एसटीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर एसटी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

..तर परवेझ मुशर्रफ यांनाही नागरिकत्व मिळावं: सुब्रमण्यम

अपघातातील जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने शिवसैनिकांनी  खासगी गाडी करून काही जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यवतमाळ पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.

नागरिकत्व कायदा: रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात