पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता आदेश काय द्यायचा आम्ही ठरवू, शरद पवारांची महाजनादेश यात्रेवर टीका

शरद पवार

राज्यातील युती सरकारमध्ये संवेदनाच उरलेली नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सरकारला काय आदेश द्यायचा हे आम्ही ठरवू, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवर टीका केली.

मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी शुक्रवारी जालन्यामध्ये जाहीर सभेत भाजप आणि शिवसेना युती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीमध्ये महापूर आला. पुराच्या पाण्यात नागरिक वाहून गेले. जनावरे वाहून गेली. शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान झाले. पण याकडे बघायला सरकारमध्ये कोणाला वेळ नाही.  मुख्यमंत्र्यांनी हवाई दौरा केला. सांगलीमध्ये तर ते फक्त अर्धा तास आले होते. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नंतर विमानाने या भागाची पाहणी केली. मी जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी किल्लारीत भूकंप झाला होता. भूकंप झाल्यानंतर सकाळी सात वाजता मी लातूरमध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर १५ दिवस मी तिथेच थांबलो. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तिथे थांबून निर्णय घेतले. पण आताच्या सत्ताधाऱ्यांना लोकांकडे बघायलाच वेळ नाही.

देशातील कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात, सीतारामन यांची घोषणा

राज्यातील तरुणांमध्ये सरकार उलथून टाकायची ताकद असल्याचे सांगून शरद पवार यांनी पुन्हा एकदा तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी उभे राहण्याची साद घातली.