पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NDA तून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही UPA सोबत नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधून बाहेर पडलो असलो, तरी सध्या आम्ही काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीसोबतही (यूपीए) नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना स्पष्ट केले. संसदेमध्ये आमचे स्वतंत्र अस्तित्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधी नव्हते. त्याबद्दल संजय राऊत यांनी, आम्ही विरोधकांसोबत कशाला जाऊ, असे उत्तर दिले.

अमेरिकी संसदेच्या एका सभागृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार सत्तेत येण्यासाठी शिवसेना केंद्रात एनडीएतून बाहेर पडली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना केंद्रात विरोधकांच्या शिष्टमंडळासोबत का गेला नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी शिवसेनेचे केंद्रामध्ये स्वतंत्र अस्तित्त्व असल्याचे सांगितले. आम्ही यूपीएमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. पण या विधेयकातील तरतुदींबद्दल शिवसेनेने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने खुलासा केल्याशिवाय राज्यसभेत शिवसेना विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचे सांगण्यात आले. 

राज्यसभेत शिवसेनेने या विधेयकाबद्दलचे आपले मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर मतदानावेळी शिवसेनेच्या राज्यसभेतील सदस्यांनी सभात्याग केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावेळीही शिवसेनेने सावरकरांच्या बाजूने भूमिका घेतली होती.

लष्कर प्रमुखांचा पाकला पुन्हा एकदा इशारा

संजय राऊत म्हणाले, यापुढील काळातही असे अनेक प्रसंग येतील. ज्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत असूनही स्वतंत्र भूमिका घेईल. याआधीही अनेक वेळा आम्ही वेगळी भूमिका घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.