पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

देवेंद्र फडणवीस

विदर्भातील जलसिंचन गैरव्यवहारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या क्लीन चीटशी आपला काहीही संबंध नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आपल्या कार्यकाळात या क्लीन चीटला मंजुरी देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली

विदर्भातील जलसिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारात अजित पवार यांची कोणतीही भूमिका नव्हती. या गैरव्यवहाराची जबाबदारी अजित पवार यांच्यावर टाकणे योग्य ठरणार नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्याच्या अखेरिस मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले होते. या संदर्भातील वृत्त शुक्रवारीच हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अल्प कालावधीच्या सरकारने २६ नोव्हेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मुंबई उच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले होते. 

HTLS 2019 : 'अर्थव्यवस्थेत सुधारणेला आणखी १८ ते २० महिने लागतील'

या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते प्रतिज्ञापत्र माझ्यापुढे किंवा सरकारमधील इतर कोणापुढेही सादर करण्यात आले नव्हते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या अखत्यारित ते मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. ते सादर करण्याच्या एक दिवस आधीच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.