पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोहोळ तालुक्यात दिसलेला 'तो' प्राणी बिबट्या नव्हे

मोहोळ तालुक्यातील (जि.सोलापूर) कुरुल-सय्यद वरवडे हद्दीत देवीचा माळ परिसरात शनिवारपासून (दि.१५) बिबट्

मोहोळ तालुक्यातील (जि.सोलापूर) कुरुल-सय्यद वरवडे हद्दीत देवीचा माळ परिसरात शनिवारपासून (दि.१५) बिबट्या दिसल्याची अफवा पसरली असून या परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सोशल माध्यमावरही तीन एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. मात्र वनविभागाने संबंधित व्हिडिओची व जागेची पाहणी केली. या व्हिडिओतील प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा दावा त्यांनी केला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; पवारांचे फडणवीसांना आव्हान

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शनिवारीच्या रात्री कुरुल, सय्यद वरवडे शिवारातील देवीचा माळ परिसरात कांही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला अशी वार्ता आली. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. देवीच्या माळा सोबतच महादेव ओढा, वाडीचा ओढा व कातेवाडी शिवारातही बिबट्या दिसल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत. सोशल माध्यमात एक तीन सेकंदाचा व्हिडिओ ही व्हायरल होत असून यामध्ये एक बिबट्या सदृश्य प्राणी काटेरी वृक्षाच्या जवळून अंधारात जात असताना दिसत आहे.

ब्रिटिश खासदाराला परत पाठवले, काँग्रेस नेत्याने केले समर्थन

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची पाहणी करून ज्या ठिकाणाहून तो बिबट्या सदृश्य प्राणी गेला आहे. त्या ठिकाणी जाउन पाहणी केली. व्हिडिओतील प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तो बिबट्या नाही तरस
व्हिडिओत दिसलेला तो प्राणी बिबट्या नसून तरस आहे, कारण बिबट्या असता तर आज मंगळवार आहे. म्हणजे शनिवारपासून आज चार दिवस झाले. बिबट्या हा एक दिवसाआड शिकार करतो. तसे काही या चार दिवसात कुठे निदर्शनास आले नाही. बिबट्या हा वजनदार असतो. त्यामुळे त्याचे कोरड्या जमिनीवरही ठसे उमटतात. आम्ही व्हिडिओतील ठिकाणी पाहणी केली. तसे तिथे काही दिसले नाही. त्यामुळे तो प्राणी बिबट्या नसून तरस आहे. तो मानवास घातक नाही, फक्त कुजलेले मांस तो खातो. त्यामुळे या प्राण्याचा मानवाला धोका नाही. 
- जयश्री पवार (वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहोळ)

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'