पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात पावसाचा जोर ओसरला; पूरस्थिती कायम

सातारा पूर

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याला झोडपून काढले. सातारा जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा, कोयना, नीरा नद्यांना पूर आला होता. मात्र पावासाचा जोर ओसरल्यामुळे काल कोयना धरणाचे दरवाजे 16 फुटांवरून 13 फुटांवर करण्यात आले आहेत. तर आज सकाळी धरणाचे दरवाजे 10 फुटांवर करण्यात आले. त्यामुळे कोयना नदीची पातळी हळूहळू कमी होत आहे. मात्र कराड शहरातील पूर परिस्थिती कायम आहे. आतापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सातारा पूरस्थितीची पाहणी केली. 

सांगलीतील ब्रम्हनाळ येथे बोट उलटली; 9 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. आज कोयना धरणातून 68 हजार 412 क्युसेक्स, कृष्णा धोम धरणातून 14 हजार 596 क्युसेक्स, वेण्णा कण्हेर धरणातून 9 हजार 734 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 5 हजार 643 क्युसेक्स तर तारळी धरणातून 8 हजार 072 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे हळूहळू पूराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. 

कोल्हापूरमधील पूरस्थिती अद्याप गंभीर, नागरिकांचे हाल

दरम्यान, कराड आणि पाटण शहराला पूराचा सर्वाधिक फटका बसला. या ठिकाणी एनडीआरएफकडून मदतकार्य केले जात आहे. दोन्ही शहरात शिरलेले पूराचे पाणी तसेच आहे. पूराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे पुणे- बंगळुरु महामार्ग अद्यापही बंद आहे. पुणे-सातारा रस्त्यावर जवळपास 10 हजार वाहनं थांबवण्यात आली आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यावर आणि पुराचे पाणी ओसरल्यानंतर ट्राफिक न होता वाहने कसे सोडता येतील याचे नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे. 

सांगलीत महापूराचा रुद्रावतार; प्रशासनाची यंत्रणा कोलमडली

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरमधून कराडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. कराड प्रितिसंगमावरून कार्वे, रेठरे बुद्रुक आणि गोंदी या ठिकाणावरून कृष्णा नदीच्या पूराची पाहणी करत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सांगलीकडे रवाना झाले आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. त्यानंतर त्यांची बैठक होणार आहे. 

पुण्यात खडकवासला धरणातील विसर्ग वाढविला