पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले

ईव्हीएम (प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नवलेवाडीमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. या संदर्भात नोंदण्यात आलेल्या आक्षेपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी

नवलेवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये कोणतेही बटन दाबले तरी मत कमळ चिन्हाला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते पूर्णपणे फेटाळले आहे. या संदर्भात खुलासा देण्यात आला असून, त्यामध्ये या मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी साडेपाच वाजता उमेदवार प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) व  दिलीप आनंदराव वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस) हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते. अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतलेला नाही. सोमवारी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र १५ भरुन देण्याबाबत सांगितले. पण त्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले

सदर तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे कीर्ती नलावडे यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:no discrepancies in evm at navalewadi voting booth in satara district clarifies election commission