पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केवळ सत्तेसाठी सर्व संधीसाधू एकत्र - गडकरी

नितीन गडकरी

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने आपल्या विचारधारेशी विश्वासघात केला. फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली असल्याची टीका भाजचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मांढल येथे गडकरींची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

भारताचे PM आहात की पाकचे अँबेसिडर? ममतांचा मोदींना सवाल

गडकरी यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारधारेवर सुध्दा टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार आणि शिवसेनेचे विचार कधी आपापसात मेळ खात नाही. ना त्यांच्या विचारात मेळ आहे ना त्यांच्या कार्यक्रमात मेळ आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी हे सगळे संधीसाधू एकत्र आले आहेत, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे. 

विश्वासघाताने येतात ते विश्वासघातच करतात: फडणवीस

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर गडकरींनी टीका केली आहे. काँग्रेसला कधी शिवसेना समोर उभी राहिलेली चालत नव्हती. ते आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. एकमेकांकडे पाहून हसत नव्हते ते एकमेकांचे हात पकडून राजकारण करु लागले आहे. हे राजकारण विचारासाठी नाही तर मतलबासाठी आहे, अशी टीका गडकरी यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे स्वतःकडे फक्त सामान्य प्रशासन खाते ठेवण्याची शक्यता

दरम्यान, सत्ता मिळाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. अशाप्रकारे अनैसर्गिक युती होते तेव्हा जनता ती कधीच पसंत करत नाही, असे गडकरी यांनी सांगितले. शिवसेना केवळ नावापुरता भगवा झेंडा आणि भगवा कपडा घेऊन काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी झाली असल्याची टीका गडकरी यांनी केली आहे. 

काँग्रेस म्हणते, सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलिंगी संबंध