पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!

गणेशोत्सव २०१९

दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता लाडक्या बाप्पाला निरोप देताना कंठ दाटून आलाय. बाप्पांचा निरोप घेताना नकळत गणरायाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचं जणू वचनच आपण मागतो, विशेष म्हणजे पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे लवकरच होणार आहे.

PHOTO : 'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक

यंदा २ सप्टेंबरला गणरायाचं आगमन झालं. मात्र पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही लवकर आहे. पुढील वर्षी गणरायाचं आगामन हे ११ दिवस आधीच होणार आहे. पंचागकर्ते दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढीलवर्षी म्हणजे २०२० मध्ये गणेश चतुर्थी ही २२ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे २०२० मध्ये गणरायाचं आगमन हे लवकर होणार आहे ही नक्कीच सर्वांसाठी आनंदाची बाब असणार आहे. 

हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती