देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरु आहे. चालू वर्षाला अलविदा करताना तरुणाईमध्ये थर्टी फर्स्टचा उत्साह देखील पाहायला मिळतो. मात्र सोलापूरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवत आगामी वर्ष आनंददायी करण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.
'मुंबई मेट्रो'च्या एमडी अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती
"हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर नका खाऊ गुटखा, नका पिऊ बियर', एकच प्याला जीवानीशी गेला, दारुची नशा करी जीवनाची दुर्दशा, दारू नको दूध प्या, खानार गुटखा मोजणार आयुष्याच्या घटका", अशा घोषणा देत महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती शाखा मोहोळ, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला, नागनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मोहोळ शहरातून व्यसन मुक्ती निर्धार रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांईने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले.
प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर; राजीनाम्याचा निर्णय मागे
दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी हजारो तरुण जुन्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयुष्यात प्रथमतः बियर, दारू, गुटखा आदिच्या सेवनास सुरुवात करतात. त्याचीच नंतर सवय लागून व्यसन जडते. याला आळा घालण्याच्या हेतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेच्या माध्यमातून दरवर्षी ३१ डिसेंबरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून व्यसनमुक्ती निर्धार रॅली शहराच्या मुख्य रस्त्यावरुन काढली जाते. या रॉलीत व्यसन मुक्तीसंदर्भातील घोषणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नाही तर परिणाम ही चांगला दिसून येत असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशिद यांनी यावेळी सांगितले.