पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... ते काय करतात मला बघायचंय, नव्या व्हिडिओवरून संजय राऊतांचे विधान

संजय राऊत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्विटर हँडलवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचा वापर करून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वापर करण्यात आला आहे. याच व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविला आहे. ते आता काय भूमिका घेतात, हे आम्हाला बघायचे आहे, असे म्हटले आहे.

... म्हणून मुंबई पोलिसांनी तब्बल १२५३७ पोस्ट सोशल साईट्सवरून हटविल्या

संजय राऊत म्हणाले, प्राण गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आमच्याकडून होणार नाही. त्याचवेळी कोणी शिवाजी महाराजांचा अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही. जो व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे तो मी शिवाजी महाराजांच्या वंशजांपासून भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्वांना पाठविला आहे. ते आता काय करतात हे मला बघायचे आहे. बाकी या विषयावर मला काही बोलायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

वंशज असल्याचे पुरावे द्या, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ झाला. सातारा आणि सांगलीमध्ये एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला. त्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

अबब ! सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोन्याचे दान

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा वापर करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तान्हाजी सिनेमातील दृश्यांचा वापर करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आज के शिवाजी - नरेंद्र मोदी असे पुस्तक प्रकाशित झाल्यावर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले होते.