पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्यांना CM उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला तुमची गरज!

उद्धव ठाकरे

कोरोना विरोधोतील लढ्यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षितांना हाक दिली आहे. लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पीटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे  येण्याची गरज आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

कोरोना विषाणूची खासगी लॅबमध्ये मोफत चाचणी व्हावीः सुप्रीम कोर्ट

उद्धव ठाकरे म्हणाले की, काही निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे. अनेक वोर्ड बॉय,  निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल  त्यांना सहभागी करून घेऊ. त्यांना मी आवाहन करतोय की महाराष्ट्राला आपली गरज आहे. केवळ अशांनी Covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी.'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार केला असून ज्यांनी आरोग्य प्रशिक्षण घेतले आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांनी आपले नाव, पत्ता राज्य सरकारला सांगावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनाचं केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये ७६ दिवसांनी हटवलं लॉकडाऊन

Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर ओरोग्य क्षेत्रासंदर्भातील कोर्सचा अनुभव असणारे लोक सरकारशी संपर्क साधू शकतात. संबंधित व्यक्तिंशिवाय अन्य कोणीही सूचना किंवा अन्य तक्रारीसंदर्भात या ईमेल आयडीवर संपर्क करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले. कोरोनाविरोधातील लढा आपण जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी आसमानी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचेही बोलून दाखवले. कोरोनाविरोधातील लढा आपण निश्चित जिंकू. त्यानंतर आपल्याला आर्थिक संकटाशी झुंजावे लागणार आहे. भविष्यातील या संकटासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.