पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

प्रकाश आंबेडकर

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुस्लिम मतदारांनी वंचित आघाडीला साथ दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठी संधी असल्याचे भाकीतही त्यांनी केले. 'एबीपी माझा'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणूक निकाल 2019: आम्ही कोणाचे गुलाम नाहीत-प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि अकोला मतदारसंघातून उभारले होते. या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. यावर त्यांन प्रश्न विचारला असता, त्यांनी मुस्लिम समाजाने वंचित आघा़डीला साथ दिली नसल्याचे म्हटले. औरंगाबाद वगळता वंचित आघाडीला मुस्लिम समाजाची मते मिळाली नसल्याचे ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न केलेल्या मनसेला आगामी निवडणुकीत मोठी संधी असल्याचे आंबेडकर म्हणाले. पण राज यांच्याबरोबर आघाडी करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. त्याचबरोबर राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.