पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी

राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी अहमदनगर येथे सभा झाली. या सभेनंतरच पक्षाच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजी महापौर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्ते यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने मध्यस्ती करत हे प्रकरण मिटवले असल्याची माहिती सांगितली जात आहे. 

पुढचा मुख्यमंत्री कोण यावर फडणवीस म्हणतात, कोई शक है आपको...

शरद पवार यांना सभा मंचावर हार घालत असताना माजी महापौर हे आमदार संग्राम जगताप यांच्या समोर उभे राहिले. याचाच राग आल्याने शरद पवार यांचा ताफा सभा स्थळावरून रवाना होताच राष्टवादीच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. आमदार संग्राम जगताप आपल्या कार्यकर्त्यासह सभास्थळावरुन बाहेर आले. त्यानंतर संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांना शिविगाळ केला. सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. 

'आयुष्यात मला पराभव माहीत नाही, राजू शेट्टींनी विचार करुन बोलावं'

दरम्यान, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर संग्राम जगताप हे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात गेले. दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी मध्यस्थी केली. अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप यांची त्यांनी पोलिस ठाण्यातच बैठक घेतील. अखेर दोन्ही गटातील वाद मिटवण्यात दादा कळमकर यांना यश आले. 

दिवाळीपूर्वीच राज्यात नवं सरकार सत्तेत