पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तरे द्यायला नाही प्रश्न विचारायला चाललोय : राष्ट्रवादी

शरद पवार

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तूर्तास चौकशीची गरज नाही, असे म्हटले आहे. शरद पवार यांनी ईडीला कार्यालयात येणार असल्याचा ई मेल केला होता. या ई-मेलला उत्तर देत ईडीने तूर्तास चौकशीसाठी कार्यालयात येण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर तोफ डागत शरद पवार ठरल्याप्रमाणे कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.  

Update: चौकशीची गरज नाही, ईडीकडून पवारांना पत्र

पत्र पाठवल्यानंतर ते चौकशीची गरज नाही, असे म्हणत आहेत. कोर्टाने त्यांना कोणतेही आदेश दिले नाहीत. मग त्यांनी गुन्हा कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केला. ईडी काही करत नाही. हा सर्व भाजपचा खेळखंडोबा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आम्ही उत्तरे देण्यासाठी नव्हे तर प्रश्न विचारण्यासाठी ईडी कार्यालयात जाणार आहोत, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.