पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

शरद पवार

श्रीरामपूर येथील माध्यमांना आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रोषास सामोरे जावे लागले. एका पत्रकाराने राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारताना उस्मानाबादचे पक्षाचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला. परंतु, संबंधित पत्रकाराने प्रश्न विचारताना तुमचे नातेवाईक पक्षापासून दूर का जात आहेत, असा प्रश्न विचारला. त्यामुळे शरद पवार हे संतापले. यात नातेवाईकांचा काय संबंध, नातेवाईकांचा प्रश्न आला कोठून, असे म्हणत ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली. त्यावेळी इतर पत्रकारांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर पत्रकार परिषद पुढे सुरु झाली. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, बार्शीचे आमदार सोपल शिवसेनेत

पक्षाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार हे श्रीरामपूरला आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यावेळी एका पत्रकाराने पद्मसिंह पाटील यांच्याबाबत पवारांना प्रश्न विचारला. 

अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. आता यात तुमच्या नातेवाईकांचीही भर पडली आहे. नातेवाईक दूर का जात आहेत, असे सांगत त्यांनी पद्मसिंह पाटलांबाबत सवाल केला. या प्रश्नामळे पवार हे भडकले. यात नातेवाईकांचा काय संबंध, असा उलट सवाल करत ते पत्रकार परिषदेतून उठून जाऊ लागले. इतर पत्रकारांनी त्यांना अडवले. तरीही संबधित पत्रकार बोलतच होता. त्यामुळे पवारांच्या संतापात आणखी भर पडली. त्यांनी त्या पत्रकाराला माफी मागण्यास सांगितले. 

निर्मला गावित आणि रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

त्यांनी त्या पत्रकाराला बोलण्यास मनाई केली. ज्यांना सभ्यता नाही, अशा लोकांना बोलावत जाऊ नका, असे म्हणत संबधित पत्रकाराला बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांनी त्यांची माफी मागितली. त्यामुळे पवार यांनी पत्रकार परिषद सुरु ठेवली. त्यानंतर विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.