पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही विरोधकच राहणार, प्रफुल्ल पटेलांनी वेगळी समीकरणे फेटाळली

प्रफुल्ल पटेल

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठीच निवडले आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. आम्ही विरोधी बाकांवरच बसणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन कऱण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भाजप-शिवसेनेतील चर्चेमध्ये आदित्य ठाकरेंना महत्त्वाचे स्थान

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत, हे मी स्पष्ट करू इच्छितो. राज्यातील सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका निभावू. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात आम्ही कोणतीही भूमिका निभावणार नाही. लोकांनी भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास तो पक्ष सत्ता स्थापन करू शकतो, असे समीकरण मांडले जात होते. केवळ भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठीच हे समीकरण मांडले जात होते. पण ते अस्तित्त्वात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

... आणि शरद पवारांच्या फेसबुक पेजवरील ते वाक्य खरे ठरले!

दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही जनतेने आम्हाला विरोधी पक्ष म्हणूनच निवडले आहे. त्यामुळे आम्ही तिच भूमिका निभावू असे म्हटले आहे. फक्त शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडे आली तरच वेगळा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NCP Praful Patel says I want to make it clear that we will be in opposition and play the role of a strong opposition