पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना, भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काढणार 'शिवस्वराज्य' यात्रा

अमोल कोल्हे

शिवसेना, भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस सुध्दा राज्यभरामध्ये 'शिवस्वराज्य' यात्रा काढणार आहे. भाजपच्या 'महाजनादेश' आणि शिवसेनेच्या 'जनआशीर्वाद' यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस 'शिवस्वराज्य' यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. राज्यातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी या यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 6 ऑगस्टपासून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. खासदार अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहे. 

करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू 15 जण गंभीर जखमी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक मोठे धक्के बसत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह 3 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासून प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्थानिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा आणि मोर्चेबांधणीचा प्रयत्न केला जाणार आहे.    

पक्षप्रवेश होत असले, तरी आमची युती अभेद्य - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. याची सुरुवात जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी येथून होणार आहे. तर या यात्रेचा समारोप बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडाराजा येथे होणार आहे.   

बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या