पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगीतुरा

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगीतुरा

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रसचे दिग्गज नेते भाजपत जात आहेत. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. सुप्रिया सुळेंच्या वॉशिंग पावडरला मुख्यमंत्र्यांनी डॅशिंग पावडर असे प्रत्युत्तर दिले होते. आता सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी डॅशिंग केमिकल म्हटलंय पण सर्वच रसायनं चांगली नसतात, असा टोला त्यांनी लगावला. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे रसायनांची मला चांगली माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले.

सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील वाहनांमुळे अडथळा, दंड ठोठावला

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांनाही इशारा दिला. जाणाऱ्यांनी सावध राहावं. भाजपवाले रसायनांची पावडर टाकत आहेत. रसायनातून काय-काय होतं, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं सांभाळून राहा, असे त्यांनी म्हटले. 

त्या पुढे म्हणाल्या की, मी परवा मुख्यमंत्र्यांना विचारलं, तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर तो स्वच्छ आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो. त्यांचं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणाले सुप्रिय सुळे, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. सगळीच रसायनं चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायनं नको, कीटकनाशकं नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनांचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे.

गव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाहीः सुप्रिया सुळे