पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष उभारलाय, सुप्रिया सुळेंचा संतप्त सूर

सुप्रिया सुळे

औरंगाबादमधील पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात पक्षाच्या दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. समोर घडलेल्या प्रकारामुळे सुप्रिया सुळेंनी संतप्त सूरात कार्यकर्त्यांना खडसावले. माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष बांधणी केली आहे. जर कोणी पक्षाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.    

उद्धव ठाकरे म्हणाले, PM मोदींनी मला वचन दिले!

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रम सुरु असताना दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे कार्यक्रम काही वेळासाठी थांबवावा लागला. सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा  र्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले. पण वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे त्यांनी संतप्त शब्दात कार्यकर्त्यांना सुनावले.  

उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट, आदित्यही दिसले सोबत

संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे या दोघांमध्ये विधानसभेच्या तिकीटवरुन नाराजी होती. संजय वाकचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, पण पक्षाने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी दिली होती. यावरुन वाकचौरेंच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. सुप्रिया सुळे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त पैठणमध्ये आल्या असताना नाराजी टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले.