पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका, देतो राजीनामा...'

अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान ईव्हीएम मशीन संदर्भात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी मी आताच खासदारकीचा राजीनामा देतो. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मी दोन-अडीच लाखांनी पुन्हा निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिरूर मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष संपणार असल्याची टीका केली होती. याला खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा कुणाला दिसली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

दरम्यान, 'ईव्हीएमसंदर्भात मी बोललो तर ४० पैशांचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवतात. तुम्ही निवडून आलात त्याचे काय असा प्रश्न विचारतात. पण मी जाहीरपणे सांगतो माझ्या मनात ईव्हीएमवर शंका आहेच. जर ईव्हीएम मशीन नसतं तर शिरुरमधून एका शेतकऱ्याचे साधं पोरगं ६० हजारांच्या मताधिक्याने निवडून आलं. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. मी आत्ताच राजीनामा देतो. नाही दोन- अडीच लाखांनी निवडून आलो तर माझं नाव बदला' असे आव्हान अमोल कोल्हे यांनी केले आहे.

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात सोमवारी रात्री पोचली. भाजपचे दिग्ग्ज नेते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. बालाजी सभागृहात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

INX मीडिया प्रकरण: सीबीआय करणार इंद्राणी मुखर्जीची चौकशी