पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत

रोहित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जितेंद्र आव्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला येत्या रविवारी म्हणजे दि. ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता ९ मिनिटे देशासाठी देण्याचे आवाहन केले आहे. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. परंतु, आश्चर्यकारक म्हणजे राष्ट्रवादीचेच आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरुन राष्ट्रवादीमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. 

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधित बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह

दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, असे टि्वट रोहित पवार यांनी केले आहे. 

रामायण, महाभारतासह डिस्कवरी ऑफ इंडियाही दाखवा, काँग्रेसची मागणी

विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी दिवे लावणे म्हणजे मुर्खपणा असल्याचे म्हटले होते. देशात रुग्णालये, मास्क, व्हेटिंलेटरची गरज आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यावर भाष्य करण्याऐवजी पंतप्रधानांनी दिवे लावण्याची भाषा करणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय लागल्याचा आरोप त्यांनी केला. तर नवाब मलिक यांनीही पंतप्रधानांना टोला लगावला. ९ बजे सुबह प्रधान मंत्री मोदीजीके भाषण से देशवासीयों के हात घोर निराशा ही लगी, सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी, साहब दिया जलाने का उपदेश दे गए, असे उपहासात्मक टि्वट त्यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp mla rohit pawar praises pm modis appeal but jitendra awhad nawab malik criticizes on outbreak of coronavirus