पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

भास्कर जाधव

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. औरंगाबाद येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी राजीनामा सपूर्द केला. विधानसभा अध्यक्षांनी त्याचा राजीनामा मंजूर केला आहे. दरम्यान, भास्कर जाधव दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जिल्हा परिषदेचे नऊ सदस्य आणि ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली. तसंच, 'भास्कर जाधव यांनी सोमवारी माध्यमांना माहिती दिली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत.' 

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दिल्ली दरबारात रंगणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी राजीनामा दिला होता. आता खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. उदयनराजे भोसले खासदारकीचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले आहे.