पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंत्ययात्रा थांबून काढा, तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाही; आव्हाडांची भाजपवर टीका

जितेंद्र आव्हाड

पूरग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर टीका होऊ लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपवर जहरी टीका केली आहे. आव्हाड यांनी टि्वट करुन आपल्या संतापाला वाट करुन दिली आहे. सरकारला मदत द्यायला उशीर झाला..रागवू नका..आता अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. 

सरकार ला मदत द्यायला उशीर झाला 
*
रागवू  नका 
*
#stickers chya 
#Design
#printing ला उशीर लागला 
मग वाटायला उशीर लागला 
*
आता #अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा 
कारण तिरड्यांवरचे #स्टिकर्स तयार नाहीत
*
#सांगली #कोल्हापूर 
टीप.. आमदार प्रत्येक तिरडीला खांदा देणार
असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे. 

पूरग्रस्तांना मदतीसाठीच्या धान्यावर भाजप आमदाराचा फोटो, विरोधकांची टीका

पूरग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि गहू वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या शिबिरांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांना घरी जाताना ही पाकिटे वाटण्यात येणार आहेत. पण त्यावर स्वतःचा फोटो लावल्यामुळे सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. 

दरम्यान, या विषयावर 'एबीपी माझा'शी बोलताना सुरेश हाळवणकर म्हणाले, जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा दक्षता समितीचा मी अध्यक्ष आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना १० किलो तांदूळ आणि गहू वाटण्याचा निर्णय घेतल्यावर मी लगेचच काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना पाकिटे तयार कऱण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी मला न विचारता, त्यावर लावलेल्या स्टिकरवर माझा फोटो छापला आहे.