भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तरी सुध्दा एसआयटीमार्फ या प्रकरणाची समांतर चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही आग्रही आहे. राज्य सरकारमार्फत याप्रकरणाची समांतर चौकशी करण्याबाबतचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर शरद पवार यांनी देखील एसआयटीमार्फेत चौकशी व्हावी असे म्हटले आहे. जळगाव येथे शरद पवार यांची पत्रकार परिषद झाले. त्यावेळी त्यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
'...तर भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करु'
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्याच्या निर्णयावरुन महाविकास आघाडीमध्ये अजूनही धुसफूस सुरुच आहे. याप्रकरणावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, 'एनआयएकडून तपास करणे हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र राज्याला देखील अधिकार आहेत. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे.' तसंच, भीमा-कोरेगाव प्रकरण घडले त्यावेळी फडणीस सरकार होते. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखे असेल. म्हणूनच केंद्राने याप्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकऱ्यांसह ५० जणांना खास निमंत्रण
दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करु, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसंच समांतर तपासाबाबत आम्ही सल्ला घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) पॉवर आहे. पण त्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.