पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर प्रकरणाचे राजकारण करु नका, त्याचा कोरोनाशी संबंध नाही: पवार

शरद पवार

'पालघरमध्ये घडलेल्या घटनेचे राजकारण करु नका, त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. ही घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशी घटना घडायला नको होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था  बिघडल्याचे चुकीचे चित्र निर्माण केले जात असून हे चूक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी पालघर प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. 

'महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण करु नका'

'पालघरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या नावलौकीकाला निश्चितच साजेसं नाही. जे घडले ते घडायला नको होते. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.', असे पवारांनी सांगितले. तसंच,  ही घटना गैरसमजुतीतून झालेली आहे. त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. याप्रकरणी काही तासांत राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घेतली. दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी १०० जणांना अटक केली. याप्रकरणाचा तपास सुरु आहे, असे पवारांनी सांगितले. 

वेतन वाढ नाही, कर्मचारी कपातही नाही, पुढील वर्षी ३५००० नवीन नोकऱ्या

दरम्यान, पालघर प्रकरणावरुन आरोप करणाऱ्यांना देखील पोलिसांनी खडेबोल सुनावले. 'सध्याच्या स्थितीत नकारात्मकता कमी करण्याची गरज आहे. पालघरवरून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवले जात आहे. या घटनेवरुन राजकारण करु नका. गैरसमजुतीतून घडलेल्या या प्रकरणावरुन राजीनाम्याची मागणी केली जात आहे हे योग्य नाही. आपण नेहमीच राजकारण करत असतो. मात्र ही राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनाला एकत्रपणे तोंड देण्याची सध्या गरज असल्याचे, पवारांनी सांगितले. 

रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण