पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

शरद पवार

'जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजचं आहेत' असे म्हणत शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर साताऱ्यातील कार्यक्रमात शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचा. लोकांनी त्यांना जाणता राजा नव्हे तर छत्रपती ही उपाधी दिली होती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

शरद पवार म्हणाले की,  'जाणता राजा' म्हणा असे मी कुणाला म्हटलेलो नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे वाचला तर शिवाजी महाराजांना लोकांनी छत्रपती ही उपाधी दिली होती, हे लक्षात येईल. जे लोक रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते सांगतात ते खोटा इतिहास लादण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही शरद पवारांनी साताऱ्यातील कार्यक्रमात केला आहे. 'जाणता राजा' हा शब्दप्रयोग रामदास स्वामींनी जन्माला घातला, असे सांगत रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असे विधानही शरद पवार यांनी यावेळी केले. शिवाजी महाराजांच्या गुरु या राजमाता जिजाऊ होत्या, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजः उदयनराजे

भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी आज के 'शिवाजी :नरेंद्र मोदी' या शिर्षकाखाली लिहिलेल्या पुस्तकामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. अखेर केंद्रातील भाजप सरकारला या पुस्तकावर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. शिवाजी महाराजांसोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात गेलेले आणि शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेल्या उदयनराजे यांनी याप्रकरणावर भाष्य करताना शरद पवारांना जाणता राजा असे का संबोधले जाते? असा प्रश्न उपस्थित केला होता.  

शिवसेनेऐवजी ठाकरेसेना नाव करा आणि बघा..., उदयनराजे कडाडले

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यावर भाष्य केले होते. होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न... अशा प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून... ते जाणता राजा आहेत, असे आव्हाडांनी म्हटले होते. त्यानंतर जाणता राजा या वादावर शरद पवारांनी भाष्य केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ncp leader sharad pawar on bjp leader udayan raje bhosale criticized opposition over a janta raja