पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटप झालं, वर्चस्व मात्र राष्ट्रवादीचंच

अजित पवार व शरद पवार

राज्यातील महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर सहा दिवसांनी म्हणजे रविवारी झाले. महत्त्वाच्या खात्यांसाठी सुरु असलेली रस्सीखेच संपुष्टात आली. आता सोमवारी संबंधित खात्यांचे मंत्री आपला पदभार स्वीकारतील. परंतु, संपूर्ण मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. कारण बहुतांश महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत. अर्थ, गृह, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, सहकार व पणन, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, अन्न व औषध प्रशासन, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे ठेवली आहेत. यावरुन शरद पवार यांनी सत्तेची सूत्रे आपल्याकडेच ठेवल्याचे दिसून येते.

खातेवाटप : अजित पवारांकडे अर्थ, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण

सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्ताराला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागला होता. यावरुन महाविकास आघाडीवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर गत सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण खातेवाटप होऊ शकले नव्हते. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महत्त्वाची खाती आपल्याकडे हवी होती. त्यामुळे परस्परातील मतभेदही समोर आले होते. अखेर शनिवारी खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले, आणि संबंधित यादी मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली. त्याला राज्यपालांनी आज मंजुरी दिली. राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्या पारड्यात पाडून सध्या तरी बाजी मारली आहे. 

इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ, दुतावास बॉम्बस्फोटांनी हादरले

राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेली मंत्रिपदं पुढीलप्रमाणे..

उपमुख्यमंत्री अजित पवार - वित्त, नियोजन
जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
अनिल देशमुख - गृहमंत्री
छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे पाटील - राज्य उत्पादन शुल्क, कामगार
नवाब मलिक- अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
बाळासाहेब पाटील - सहकार, पणन
राजेश टोपे- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ - ग्रामविकास
दत्ता भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन (राज्यमंत्री)
अदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क (राज्यमंत्री)
संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्यमंत्री (राज्यमंत्री)
प्राजक्त तनपुरे - नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन (राज्यमंत्री)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader sharad pawar domination on maha vikas aghadhi minister portfolio distribution