पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या; शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील

सांगलीमध्ये आणखी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास तिघांनी धारधार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ६३६ वर

मनोहर पाटील गुरुवारी रात्री कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले होते. त्याचवेळी शिवसेनेचे पदाधिकारी दिनकर पाटील यांच्यासह तिघांनी मनोहर पाटील यांच्यावर हल्ला केला आणि हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी मनोहर पाटील यांना तातडीने मिरज येथील मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान रात्री उशिरा पाटील यांचा मृत्यू झाला. 

अमेरिकेच्या हल्ल्यात अल कायदाचा नेता कासिम अल-रेमी ठार

याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.शिवसेना पदाधिकारी दिनकर पाटील, त्यांचा पुतण्या अभिजीत युवराज पाटील आणि विनोद बाजीराव पाटील यांना पोलिसांनी अटक केली. मनोहर पाटील यांची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांची देखील हत्या करण्यात आली होती. एकाच आठवड्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु